मुंबई : अनेकांची परदेशात जाण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्यासाठी कंटाळादेखील करतात. पासपोर्ट काढण्यासाठी असलेली प्रक्रिया आणि त्याला लागणारा वेळ यामुळे अनेकजण पासपोर्ट काढण्याकडे दुर्लक्ष करतात. तर, काहीजण  एजंटला पैसै देऊन पासपोर्टसाठीची प्रक्रिया पूर्ण करतात. खरंतर तुम्ही घरबसल्या पासपोर्ट काढू शकता. पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. 


>> पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा


- पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम पासपोर्ट सेवा वेबसाइटवर जा. यानंतर येथे आपली नोंदणी करा.


- तुमचे खाते आधीच तयार केले असल्यास येथे लॉगिन करा.


- हे केल्यानंतर, ताज्या पासपोर्टसाठी अर्ज करा/पासपोर्ट पुन्हा जारी करा या पर्यायावर क्लिक करा.


- आता तुम्हाला एक अर्ज दिला जाईल, येथे विचारलेले सर्व तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.


- आता तुम्ही होम पेजवर जाऊन View Saved/Submitted Applications वर क्लिक करून तुम्ही अर्जात कोणती माहिती नमूद केली आहे ते पाहा.


- यानंतर पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. याद्वारे तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करू शकता.


- आता पेमेंट पर्याय निवडा आणि पेमेंटसह पुढे जा.


यानंतर अर्जाची पावती प्रिंट करा आणि पावती डाउनलोड करा. 


ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल त्या दिवशी तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रात जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घ्या.


>> ही कागदपत्रे आवश्यक आहेत


पासपोर्टसाठी तुम्ही सध्याचा निवासी पत्त्याचा पुरावा, वीज किंवा इतर कोणतेही बिल, आयकर मूल्यांकन ऑर्डर, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, भाडे करार (भाड्यावर राहत असल्यास) आणि  जर तुमच्या पालकांकडे पासपोर्ट असेल तर त्याची प्रत सोबत ठेवा. तुम्ही तुमच्यासोबत जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊ शकता. 


पासपोर्ट किती दिवसात मिळले?


तुमचे कागदपत्रे योग्य असल्यास पासपोर्ट सेवा केंद्रात साधारणपणे किमान एक तासात अर्ज प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पासपोर्ट किती दिवसात येईल, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो.


पासपोर्ट घरी येण्यासाठी किती दिवस लागतात?


पासपोर्ट मिळवण्यासाठी सामान्यपणे 30 ते 45 दिवस लागतात. तर, तातडीने पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केल्यास त्याला 7 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. याचा अर्थ तुम्हाला दोन आठवड्यात पासपोर्ट मिळू शकेल. तातडीने पासपोर्ट मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागते. त्याची माहिती तुम्हाला अर्ज भरताना संकेतस्थळावर मिळेल.