Gold Silver Rate: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं आणि चांदी महागली आहे. सोन्यापेक्षा चांदीनं आज खरेदीदारांना धक्का दिलाय. 
आठवड्याच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या चांदीचे दर वाढले आहेत. चांदीच्या दरात एकाच दिवसात 1 हजार 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोनं 72000 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
 
चांदीच्या दरात अचानक वाढ झाली आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात 1200 रुपयांची उसळी पाहायला मिळाली. चांदी 72,000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळं चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 


सोन्याच्या दरातही वाढ 


सुरुवातीच्या टप्प्यात आज सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅमसाठी 57 हजार 382 च्या पातळीवर पोहोचले होते. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता ते कालच्या तुलनेत 282 रुपयांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी वाढले आहे. आज बाजारात सोन्याचे दर हे 57 हजार 410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहेत. काल (28 सप्टेंबर) बाजारात सोन्याचे दर हे  57 हजार 128 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.


शुक्रवारी सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली. दुपारी 1 वाजेपर्यंत कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 1.70 टक्क्यांची म्हणजेच 1200 रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर हे 71,800 रुपयांवर पोहोचले. 


जाणून घ्या 'या' 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर


दिल्ली- 24 कॅरेट सोने 58,680 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 59,450 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 58,800 रुपये, चांदी 77,500 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 58,530 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 58,680 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 58,580 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 58,680 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 58,680 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 58,680 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 58,530 रुपये, चांदी 74,700 रुपये प्रति किलो


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं महागलं 


देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली जात आहे. आज सोन्याच्या दरात 0.1 टक्क्यांची वाढ झाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.