नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत अपेक्षित यश मिळवल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रया समोर येत आहे. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण यावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.



'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना...' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.



मुंबई महापालिका निवडणुकीपासून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली आहे. आता गुजरात निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी शिवसेनेलाच टार्गेट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आघाडीवर

सध्या गुजरातमध्ये मतमोजणी सुरु असून आतापर्यंत भाजप 108 जागांवर तर काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे यंदाही भाजप एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये शिवसेनेनं 40हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला शिवसेनेनं उमेदवार देणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर 40 उमेदवार उभे करत भाजपची डोकेदुखी वाढवली होती. पण या सगळ्यावर मात करत भाजपनं गुजरातची सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे.

संबंधित बातम्या :

LIVE हिमाचल प्रदेश निवडणूक 2017 निकाल: भाजप बहुमताकडे

गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?

सौराष्ट्र कच्छ निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

उत्तर गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

दक्षिण गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

मध्य गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE