Haridwar Maha Kumbh 2021: हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये दुसऱ्या सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर,बहुतांश राज्यांनी निर्बंध लागू केलेले असताना हरिद्वारमधील  कुंभ मेळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला आहे. 10 ते 14 एप्रिल कुंभमेळ्याच्या परिसरात दरम्यान 1700  लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत पाच दिवसात 2,36,751 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1701 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


हरिद्वारचे मुख्य वैद्यकिय अधिकारी शंभु कुमार झा म्हणाले, आतापर्यंत मागील पाच दिवसात केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपीड अँटीजन टेस्टचे हे आकडे आहेत. अजूनही काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. पण परिस्थिती पाहता हा आकडा 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


हरिद्वार येथील  कुंभ मेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाचे औचित्य साधत मोठ्या संख्येनं साधू - संत गंगा नदीत स्नान करत असल्याचं पाहायला मिळाले. यामध्येच कोरोनाचं संकट असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं इथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. यामध्ये 48.51  लाख जण सहभागी झाले होते. 


सोशल डिस्टन्सिंगचे नियम या भागात लागू करण्यात आल्याचे प्रयत्न केल्यास इथं चेंगराचेंगरीचं संकट ओढावलं जाऊ शकतं. त्यामुळं या भागात अशा पद्धतीचे नियम लावण्यात आपण असमर्थ असल्याचं यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. निर्धारित वेळेसाठी या भागात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला गेल्यानंतर विविध साधूंचे आखाडे इथं शाही स्नानासाठी आले होते. त्यामुळं एकंदर ही परंपरा जपत असताना कोरोनाच्या संकटाचा मात्र सर्वांना विसर पडत असल्याचं चित्र दिसले.