नवी दिल्ली : मुगाची खिचडी आता राष्ट्रीय खाद्य घोषित होणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी दिल्लीत मुगाच्या खिचडीला हा दर्जा दिला जाणार आहे.


केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं दिलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. श्रीमंत असो वा गरीब, मुगाची खिचडी सर्वांनाच आवडते. त्यामुळेच या पदार्थाला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे. 4 तारखेला खिचडीला राष्ट्रीय भोजन जाहीर करताना त्याची पाककृतीही दाखवली जाणार आहे.

इतकंच नाही, खिचडी आरोग्यासाठी गुणकारी असल्यानंही हा निर्णय घेण्यात आला आहे. डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी ही डिश असल्याचं म्हटलं आहे. मुगाची खिचडी ही चविष्ट, कमी वेळात आणि खर्चात तयार होत असल्यानं तिला हा दर्जा मिळत आहे.