पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 08:17 PM (IST)
इस्लामाबादः भारताकडून पाकिस्तानशी नेहमी शांततेने चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र तरीही पाकची 'नापा'क कारस्थानं चालूच असतात. भारताच्या काश्मीरमधील उरी येथील बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवानांचा मृत्यू झाला. त्यातच पाकिस्तानने पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे. काश्मीरप्रश्न केवळ चर्चेनेच सोडवला जाऊ शकतो. शांतता ठेवण्यासाठी काश्मीर प्रश्नावर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं असल्याचंही आसिफ यांनी सांगितलं. दरम्यान पाकिस्तानने अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा धमकी देण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेताच पाकिस्तानकडून आण्विक हल्ल्याची धमकी दिली जाते. संबंधित बातमीः