तिरुअनंतपूरम (केरळ) : अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका 23 वर्षीय तरुणीने गुप्तांगच कापलं.  केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली.


धक्कादायक म्हणजे या नराधम साधूला पीडित तरुणीच्या आईचीही साथ होती. हा साधू आपण बारावीत असल्यापासून बलात्कार करत होता, असा आरोप पीडित तरुणीचा आहे.

हा साधू शुक्रवारी रात्रीही बलात्काराचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वैतागलेल्या तरुणीने थेट चाकू घेऊन, त्याचं जनेंद्रीयच कापलं.

गंगेसानंद असं या साधूचं नाव आहे. गुप्तांग कापल्यामुळे जखमी झालेल्या गंगेसानंदला तरुणीच्याच नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्याचं गुप्तांग 90 टक्के कापलं गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचार करण्यात येत आहेत.

हा साधू गेल्या पाच वर्षांपासून या तरुणीच्या घरी येत होता. त्याचे तरुणीच्या आईशी अनैतिक संबंध होते.  आईला हाताशी धरुन हा साधू मुलीवरही जबरदस्ती करत होता. तरुणी बारावीत असल्यापासून हा साधू तिच्यावर बलात्कार करत होता, अशी माहिती तीने पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.