कोची : केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड दिली आहे. 140 जागांच्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे. इथे डाव्या आघाडीने 81 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला 50 जागांवर आघाडी मिळवता आली.
दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे. आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान, केरळमध्ये काँग्रेस आणि मुख्यमंत्री ओमन चांडी यांना राज्यातील सोलर घोटाळा तसचं या घोटाळ्याशी संबंधित सरिता नायर ही महिला भारी पडल्याचं दिसत आहे. केरळमध्ये सोलर पॅनल लावण्यासाठी कोट्यवधीचा व्यवहार झाला होता. तसंच सरिताचे काही आक्षेपार्ह व्हिडीओदेखील समोर आले होते. इतकंच नाही तर सरितानेच ओमन चांडी यांचं नाव घेतलं होतं.