योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना कपिल मिश्रांचा परफॉर्मन्स पाहून गुरु (केजरीवाल) गुळ झाले, तर शिष्य (कपिल मिश्रा) साखर बनल्याचं म्हणलं आहे.
तसेच कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर केलेले आरोप जुने असले, तरी ते गंभीर असल्याचंही त्यांनी म्हणलं आहे. शिवाय, कपिल मिश्रांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच काळ्या पैशांच्या मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेस गप्प का असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला.
आम आदमी पार्टीतून निलंबित झालेले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपच्या देणगीबाबत केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले.
‘आप’मध्ये सर्रासपणे काळ्याचं पाढरं केलं जातं : कपिल मिश्रा
‘आप’ने निवडणूक आयोगाला पक्षाच्या निधीबाबत चुकीची माहिती दिली. वास्तविक, आपने बनावट कंपन्यांकडून देणगी घेतली असून, अनेकांचा काळा पैसा सर्रासपणे पांढरा केला गेला.
2013-14 मध्ये आपच्या बँके खात्यात 45 कोटी रुपये जमा झाले, मात्र वेबसाईटवर केवळ 19 कोटी रुपये दाखवण्यात आले. म्हणजेच 26 कोटी रुपये लपवले, असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला.
कपिल मिश्रांनी यावेळी केजरीवालांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलतानाच पाच दिवसांपासून उपोषण करणारे कपिल मिश्रा बेशुद्ध झाले.
संबंधित बातम्या