कामारेड्डी (तेलंगाणा) : तेलंगणातील कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात (Kamareddy assembly constituency of Telangana) भाजपचे (BJP) कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी (Katipally Venkata Ramana Reddy) विजयी झाले आहेत. उद्योगपती राजकारणी झालेल्या कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) अध्यक्ष रेवंत रेड्डी (A Revanth Reddy) आणि आणि विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते, यांचा पराभव करत खळबळ उडवून दिली आहे.


भाजपचे के वेंकट रमणा रेड्डी यांनी कामारेड्डी विधानसभा निवडणुकीत 2023 च्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री उमेदवार रेवंत रेड्डी या दोघांचाही पराभव केला आहे. शिक्षण नसतानाही 53 वर्षीय रमाना रेड्डी यांनी बरीच संपत्ती कमावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण घोषित मालमत्ता 49.7 कोटी रुपये आहे ज्यात 2.2 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 47.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांचे एकूण घोषित उत्पन्न 9.8 लाख रुपये आहे ज्यापैकी 4.9 लाख रुपये हे स्वत:चे उत्पन्न आहे. कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांच्यावर एकूण 58.3 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत.


ग्रामीण मतदारसंघ म्हणून वर्गीकृत 


कामारेड्डी उत्तर तेलंगणात स्थित आहे आणि कामारेड्डी जिल्ह्याचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती (14.73 टक्के) आणि अनुसूचित जमाती (4.67 टक्के) लोकसंख्येसह ग्रामीण मतदारसंघ म्हणून वर्गीकृत आहे. जिल्ह्यातील अंदाजे साक्षरता दर 48.49 टक्के आहे. 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत, मतदारसंघात एकूण 2,45,822 पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली होती, ज्यामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये जवळजवळ समान विभाजन होते.


कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ हा निजामाबाद जिल्ह्याचा भाग आहे. विधानसभेची जागा स्थानिक प्रशासन आणि क्षेत्राचे प्रतिनिधित्व यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येचं मिश्रण आहे. ज्यामध्ये कृषी आणि संबंधित प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. तोच स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.


रेवंत रेड्डींकडून रोड शो


दुसरीकडे, तेलंगणात विजय निश्चित झाल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी रोड शो केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने जल्लोष करत झेंडे फडकावले. तत्पूर्वी, रविवारी तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांनी इतर पोलिस अधिकार्‍यांसह रेवंत रेड्डी यांच्यासोबत हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली.


"बाय बाय केसीआर" असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि राज्य पक्षाचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. तेलंगणा निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. कर्नाटकनंतर तेलंगणामध्ये विजय मिळाल्याने दक्षिण भारतात स्थान मजबूत झालं आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांतील विजयामुळे दक्षिणेकडील प्रदेशात काँग्रेसचा ठसा मजबूत होईल.


इतर महत्वाच्या बातम्या