श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या जवानांना लाथा-बुक्क्या मारणाऱ्या नराधमांची ओळख पटली आहे. ज्या काश्मिरी तरुणांनी बंदूकधारी जवानांवर हात उचलले, त्यांना जेरबंद करण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत.


जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण हे बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीआरपीएफचे महासंचालक आज श्रीनगरला जाणार आहेत.

काय आहे प्रकरण?

9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांची तळपायाची आग मस्तकात गेली.

श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल


पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.


विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मानाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.

 एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर

भारतीय जवानांना मारल्या जाणाऱ्या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा, अशा शब्दात टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतम गंभीरचा संताप अनावर झाला. त्याने ट्वीटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.