चेन्नई : द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम करुणानिधी यांना गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घसा आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे करुणानिधींना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
श्वसनास त्रास होत असल्यामुळे करुणानिधी यांना पुन्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. संसर्ग दूर करण्यासाठी उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत असल्याचं एका परिपत्रकात म्हटलं आहे.
गेल्या महिन्याभरात हॉस्पिटलवारीची करुणानिधींची ही दुसरी वेळ आहे. एक डिसेंबरला त्यांना अॅडमिट केल्यानंतर सात तारखेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.