कर्नाटकमध्ये 900 सिलेंडरचा स्फोट, तीन ट्रक खाक
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2016 11:18 AM (IST)
बंगळुरु : कर्नाटकच्या कोलारमध्ये तीन ट्रकमधील तब्बल 900 सिलेंडरचा स्फोट झाला. चिंताणणी गावात काल (रविवार) रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेत 3 ट्रक जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. सुरुवातीला सिलेंडर असलेल्या एका ट्रकला आग झाली. त्यानंतर बाजूला असलेले सिलेंडरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे रात्रभर सिलेंडरचे स्फोट होत होते. स्फोटामुळे रात्री संपूर्ण परिसर हादरला होता. गावाजवळच्या परिसरात एलपीजीचा वास पसरला आहे. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. सिलेंडर स्फोट कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आहे. पाहा व्हिडीओ https://twitter.com/ANI_news/status/813240467559104512