बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 30 डिसेंबरनंतरही कायम : बँकिंग तज्ञ
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2016 09:24 AM (IST)
नवी दिल्ली : नोटाबंदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची डेडलाईन दिली आहे. मात्र 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती, बँकिंग तज्ञांनी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएममधूनही पैसे काढण्याची मर्यादा फक्त 500 ते 1 हजार रुपयांनी वाढू शकते. नोटाबंदीचा आज 47 वा दिवस आहे. त्यामुळे 50 दिवस कळ सोसा मग चित्र बदलेल,असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याला आता केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नववर्षात तरी चलनकल्लोळ थांबणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय.