नवी दिल्ली माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (Deve Gowda) यांचे कुटुंबीय सेक्स स्कँडलच्या आरोपांत घेरलं गेले आहेत. देवेगौडा यांचे चिरंजीव- आमदार एच. डी. रेवण्णा आणि नातू- खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna)  यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला आयोगाच्या शिफारशीवरुन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक पोलीस महानिरीक्षक बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे.  तर इतर दोन सदस्यांमध्ये सुमन डी. पेणेकर (डीजी, सीआयडी) आणि म्हैसूरच्या आयपीएस सीमा लाटकर यांचा समावेश आहे. 


एसआयटीला तपास लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेवण्ण हासन या लोकसभेच्या एनडीएच्या उमेदवार आहेत.  26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. हास नमध्ये विक्रमी 77 टक्के मतदान झाले. माजी मंत्री जी पुट्टास्वामी गौडा यांचे नातू श्रेयस एम पटेल हे रेवण्णा येथून निवडणूक रिंगणात आहेत. होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलमांतर्गत   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घरकाम करणाऱ्या महिलेने केले गंभीर आरोप 


एसआयटी आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. माजी पंतप्रधानांच्या नातवावर मोलकरणीने गंभीर आरोप केले आहेत. पीडितेचा आरोप आहे की, काम सुरू केल्यानंतर चार महिन्यांनंतर रेवण्णाने तिचा लैंगिक छळ सुरू केला. एवढच नाही तर  रेवण्णा तिच्या मुलीला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी अश्लील  बोलायचे .  महिलेच्या सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी मोलकरीण रेवन्ना यांच्या पत्नीच्या ओळखीची आहे.


रेवण्णा देश सोडून पळून गेले?


अलीकडच्या काही दिवसांत, त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ देखील  लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला . शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेवण्णा यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र रेवण्णा देश सोडून गेल्याची बातमी आहे. लुफ्थांसा एअरलाईनने ते जर्मनीला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.


परदेशातील लोकांना परत आणण्याची जबाबदारी एसआयटीची :  गृहमंत्री


 कर्नाटकचे गृहमंत्री जी. प्रसारमाध्यमांशी बोलताना परमेश्वरा म्हणाले की, जर रेवण्णा परदेशात गेले असतीव तर त्यांना परत आणण्याची जबाबदारी एसआयटीची असणार आहे. तपास कसा करायचा हे आम्ही एसआयटीला सांगणार नाही, असे ते म्हणाले.


हे ही वाचा :


MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ