बंगळुरु : मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.


जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांच्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली.

कुमारस्वामी यांचा शपथविधी सोमवारी होणार होता, मात्र 21 मे रोजी राजीव गांधी यांचा स्मृतिदिन असल्यामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. शपथविधीची जागा आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

दरम्यान, येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

येडियुरप्पा यांचं भावूक भाषण

आज दुपारी साडेतीन वाजता कर्नाटक विधानसभेच कामकाज पुन्हा सुरु झालं. यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केलं. कन्नड भाषेतून केलेल्या भाषणात त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसवर टीका केली.

तसंच मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन असं ते म्हणाले.

येडियुरप्पांच्या भाषणातून ते समारोप किंवा निरोपाचं भाषण करत आहेत, हे दिसून येत होतं. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

कर्नाटक विधानसभेचं गणित

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे.

मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ होतं. त्यामुळे भाजपला अजूनही 7 जागा कमी पडत होत्या.

LIVE UPDATE


कुमारस्वामी सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, राज्यपाल वजूभाई वाला यांच्या भेटीनंतर घोषणा


येडियुरप्पा यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

प्रकाश जावडेकर यांची सायंकाळी 6 वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद

काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा

येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

कर्नाटकात लोकसभेच्या 28 पैकी 28 जागा आम्ही जिंकू : येडियुरप्पा

4.00 PM केंद्राच्या निधीचा कर्नाटकात योग्य वापर झाला नाही : येडियुरप्पा

3.49 PM भाषणादरम्यान येडियुरप्पा भावूक, निरोपाच्या भाषणासारखं येडियुरप्पांचं भाषण, राजीनामा देण्याची शक्यता

3.49 PM येडियुरप्पा राजीनामा देण्याच्या तयारीत?

3.49 PM काँग्रेसकडे 122 आमदार होते, हा आकडा 78 वर आलाय, सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली होती की कुमारस्वामींना मुख्यमंत्री होऊ देणार नाही - येडियुरप्पा

3.49 PM सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरलं, काँग्रेस आणि जेडीएस निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले आणि सत्तेसाठी एकत्र आले - येडियुरप्पा

3.49 PM जनतेने कौल आम्हाला दिला, मागच्या निवडणुकीत 40 आमदार होते, यावेळी 104 आहेत - येडियुरप्पा

3.46 PM भाजपकडून बहुमताचा प्रस्ताव सादर

3.44 PM विधानसभेत येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात

3.30 PM विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात, सर्वपक्षीय नेते प्रेक्षक गॅलरीत उपस्थित

2.59 PM येडियुरप्पांची अमित शाहांसोबत चर्चा: सूत्र

2.30 PM येडियुरप्पा आणि भाजप नेत्यांची तातडीची बैठक

2.00 PM कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री येडियुरप्पा बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता आलं नाही तर राजीनामा देतील असं वृत्त कर्नाटकातील प्रमुख वृत्तवाहिनी टीव्ही 9 कन्नडने दिलंय. मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहतील तेव्हा करावयाचं 13 पानाचं भाषण तयार असल्याचंही टीव्ही 9 कन्नडच्या वृत्तात म्हटलंय.

बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनाही कल्पना दिल्याचं वृत्त आहे.

आता बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे

1.20 PM  येडियुरप्पांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेलवर दोन आमदारांना डांबून ठेवलं, काँग्रेसचा आरोप

01.11 PM- काँग्रेस आमदाराशी बोलताना येडियुरप्पांची ऑडिओ क्लिप, काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप जारी

01.03PM - येडियुरप्पांच्या मुलाने आमच्या दोन आमदारांना हॉटेलमध्ये कैद करुन ठेवलं, काँग्रेसचा आरोप, पोलीस हॉटेलकडे रवाना

12.50PM - काँग्रेसचे दोन आमदार सभागृहातून गैरहजर, काँग्रेसचे एकूण पाच आमदार संपर्कात, भाजपच्या सूत्रांचा दावा

12.43PM - काँग्रेस-जेडीएसचे सहा आमदार गायब

12.40PM - आतापर्यंत 70 आमदारांचे शपथविधी पूर्ण, दीड वाजेपर्यंत सर्व आमदारांचे शपथविधी पूर्ण होण्याची शक्यता

12.11 PM- कर्नाटक विधानसभेत एकूण 218 आमदार उपस्थित, जेडीएसचे दोन आमदार अजूनही गैरहजर

11.58 AM - आमदारांचा शपथविधी चालू, काँग्रेसचे दोन आमदार अजूनही अनुपस्थित

11.51 AM - शपथविधीला 3 आमदारांची गैरहजेरी, काँग्रेसचे 1 आणि जेडीएसच्या 2 आमदारांचा समावेश

11.44 AM - बहुमतचाचणी पूर्वी सभागृहात आमदारांचा शपथविधी सुरु, मात्र काँग्रेसचे 2 आमदार अजूनही पोहोचले नाहीत, येडियुरप्पांचे निकटवर्तीय काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील नॉट रिचेबल

11. 12 AM सभागृहात आमदारांचा शपथविधी सुरु

11.12 AM सुप्रीम कोर्टाने काँग्रेस-जेडीएसची मागणी अमान्य, हंगामी अध्यक्ष भाजपचेच

11.11 AM कपिल सिब्बल: के जी बोपय्यांची नियुक्ती घटनाबाह्य

न्यायमूर्ती : बोपय्यांची बाजूही ऐकावी लागेल, त्याशिवाय त्यांना हटवणं अयोग्य. त्यांना नोटीस पाठवावी लागेल. त्यामुळे आजची बहुमत चाचणी रद्द होऊ शकते.

11.10 AM #KarnatakaFloorTest : बहुमत चाचणी पारदर्शी व्हावी, त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण करुन सर्व चॅनल्सना पुरवा - सुप्रीम कोर्ट

11.00 AM - मुख्यमंत्री येडियुरप्पांसह कर्नाटकातील आमदार विधानसभेत (विधानसौद) दाखल

10.56 AM- के जी बोपय्यांची नियुक्ती घटनाबाह्य, काँग्रेस वकील कपिल सिब्बल यांची कोर्टात युक्तीवाद

10.35 AM  ज्येष्ठता डावलून हंगामी अध्यक्षपदी निवड झालेल्या के जी बोपय्यांना विरोध, काँग्रेस-जेडीएसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात  सुनावणी सुरु

10.24 AM काँग्रेस आमदार विधानसभेकडे रवाना

10.15 AM बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मंगलोरमध्ये जमावबंदी आदेश

10.00 AM माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांचं विधानसौदमध्ये आगमन

8.54 AM दुपारी 4.30 पर्यंत वाट पाहा, आम्ही बहुमत सिद्ध करु, येडियुरप्पा 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा

8.53 AM  जेडीएसचे आमदार बंगळुरुतील हॉटेलवर दाखल

8.45 AM मी शंभर टक्के बहुमत सिद्ध करणार. उद्या मी कर्नाटकच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणीला सुरुवातही करणार: येडियुरप्पा

7.50 AM मुख्यमंत्री येडियुरप्पा  पक्षाच्या विधीमंडळ बैठकीसाठी शंग्रिला हॉटेलकडे रवाना. आज सकाळी 9 वा, पक्षाची विधीमंडळ बैठक होत आहे.

येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, दुपारी 4 वाजता बहुमत चाचणी  

हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला विरोध

दुसरीकडे भाजपने ज्येष्ठता डावलून के जी बोपय्या यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस-जेडीएसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

के जी बोपय्या हे भाजपचे आमदार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विराजपेठ मतदारसंघातून ते निवडून आले. बोपय्या हे तीन वेळा आमदारपदी निवडून आले आहेत. बोपय्या यांनी 2009 ते 2013 या कालावधीत विधानसभा अध्यक्षपदही भूषवलं आहे. प्रो टेम स्पीकर म्हणूनही यापूर्वी त्यांनी काम केलं आहे.
दोन ज्येष्ठ आमदारांना डावलल्यामुळे बोपय्या यांना कॉंग्रेस आणि जेडीएसचा विरोध आहे. आठ वेळा आमदारकी भूषवणाऱ्या आर वी देशपांडे यांची नियुक्ती अपेक्षित असताना बोपय्यांना हंगामी अध्यक्षपद दिल्याने काँग्रेस-जेडीएस खवळले आहेत.