येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
आज येडियुरप्पा यांनी एकट्यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.
कोर्टाचा हिरवा कंदील
सुप्रीम कोर्टाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे 5 पर्यंत ऐतिहासिक सुनावणी घेत, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. कर्नाटकच्या राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवला.
त्यामुळे बी एस येडियुरप्पा यांनी ठरवल्याप्रमाणे 17 मे रोजी 9 वा. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.
मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे.
याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.
LIVE UPDATE
- येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान
- माजी पंतप्रधान देवेगौडाही काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचले
https://twitter.com/ANI/status/996990195919675392
- येडियुरप्पा सरकारविरोधात कर्नाटक विधानभवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन, दोन पक्षांचीही आंदोलनाला साथ
- नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा विधानभवनात दाखल
https://twitter.com/ANI/status/996979421448814593
- काँग्रेस आमदारांचं कर्नाटक विधानभवनाबाहेर आंदोलन
https://twitter.com/ashokgehlot51/status/996977424465248256
- काँग्रेस आमदार कर्नाटक विधानभवनाबाहेर आंदोलन करणार
- आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- कर्नाटकात कडेकोट बंदोबस्त
- येडियुरप्पा निवासस्थानाकडून राजभवनकडे रवाना
- येडियुरप्पा यांचा आज शपथविधी, सकाळी 9 वा. शपथविधी
मध्यरात्री सुनावणी
येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात रात्री पावणे दोन ते तब्बल पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टानं येशपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला.
कर्नाटकात भाजपचा रडीचा डाव?
सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत, पुढील सुनावणी उद्या सकाळी 10.30 वाजता ठेवली आहे. त्यामुळे येडियुरप्पांचा आज सकाळी 9 वाजता होणारा शपथविधी सोहळा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.
कोर्टाने समर्थक आमदारांची यादी मागितली
शपथविधी रोखण्यास नकार देऊन कोर्टाकडून भाजपला दिलासा मिळाला असला तरी भाजपचा मार्ग सुकर झाला असं नाही. कारण, कोर्टानं भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागितली आहे. त्याबाबत उद्या पुन्हा साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा कशा पद्धतीनं जुळवणार हा ही एक प्रश्न आहे.
कर्नाटकात बहुमताचा आकडा 112 इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104
काँग्रेस 78
जनता दल (सेक्युलर) 37
बहुजन समाज पार्टी 1
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
अपक्ष 1
संबंधित बातम्या
सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील!
कर्नाटकात भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण
चूक सुधारणार, वडिलांवरील डाग पुसणार: कुमारस्वामी
आकडेवारी : कर्नाटकात कोण आणि कसं सरकार स्थापन करणार?
कर्नाटकात भाजपचा रडीचा डाव?