बंगळुरु : 2014 लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने तब्बल 21 राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीही भाजपच्या विजयाने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. पण पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांची सोशल मीडियावरील मजबूत पकड या निवडणुकीत कामी आली.


गुजरात निवडणुकीतून धडा घेत, कर्नाटकचा गड जिंकण्यासाठी भाजपने छोट्या छोट्या गोष्टींवरही विशेष लक्ष दिलं. अमित शांहांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत वापरलेला 'पन्ना प्रमुख' हा यशस्वी फॉर्म्युला कर्नाटकातही वापरला. पण शाहांनी यावेळी तो दो भागात विभागला, तो म्हणजे पन्ना आणि अर्ध पन्ना प्रमुख.

भाजपने राज्यात अर्ध पन्ना प्रमुखांची टीम बनवली. पक्षाने राज्याच्या 56,696 मतदान केंद्रावरील 4.96 कोटी मतदातांसाठी सुमारे 10 लाख अर्ध पन्ना प्रमुखांची नेमणूक केली. म्हणजेच एक अर्ध पन्ना प्रमुखाकडे 45 ते 50 मतदारांची जबाबदारी होती.

गुजरात निवडणुकीत अनेक जागांवर कमी अंतराच्या विजय-पराभवानंतर काँग्रेसने कर्नाटकमध्ये हा फॉर्म्युला लागू केला. कर्नाटकमधील भाजपचे निवडणूक प्रबंधक मुरलीधर यांच्याकडे सोपवली होती. राज्यात अर्ध पन्ना प्रमुख बनवण्याचं काम मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुरु झालं होतं.

जाणकारांच्या माहितीनुसार, 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, पन्ना प्रमुखांची रणनीती अमित शाहांनीच आखली होती. त्यांना हा फॉर्म्युला उत्तर प्रदेशमध्ये लागू केला. त्याचा परिणाम म्हणजे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 403 पैकी 325 जागा मिळाल्या. यानंतर हा फॉर्म्युला प्रत्येक राज्यात लागू केला आणि भाजपचा विजय झाला.

पन्ना प्रमुख म्हणजे काय?
पन्ना प्रमुखचा अर्थ पेज इन्चार्ज. प्रत्येक मतदान केंद्रात मतदार यादी असते. या यादीत सामान्यत: 16 ते 30 पानं असतात. एका पानावर सुमारे 100 मतदारांची नावं असतात. या पानांवर असलेल्या मतदारांवर लक्ष ठेवणं हे पन्ना प्रमुखांचं काम असतं. म्हणजेच पन्ना प्रमुख प्रत्येक केंद्रावरील मतदारांशी थेट संपर्कात राहतात आणि भाजपला मत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अर्ध पन्ना प्रमुखाची नेमणूक का?
एका पन्ना प्रमुखाला 100 मतदारांकडे लक्ष देणं कठीण असतं. त्यामुळे प्रत्येक पानासाठी दोन अर्ध पन्ना प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. ही भाजपची सर्वात लहान शाखा आहे.

अर्ध पन्ना प्रमुखांच्या वर पन्ना प्रमुखांना ठेवण्यात आलं. त्यांच्यावर केंद्र प्रमुख. मग परिसर प्रमुख आणि निवडणूक प्रभारीला जागा देण्यात आली.

संबंधित बातम्या

कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!

‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: भाजपचं सेलिब्रेशन

राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री

कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: बेळगावात काँग्रेसला आघाडी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अकरा हजार मतांनी पिछाडीवर

बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल