कर्नाटक विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिपोर्टने (एडीआर) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून एडीआरने कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमी दिली आहे. उमेदवारांवरील गुन्हे, संपत्ती, शिक्षण इत्यादी गोष्टींची आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात एकूण 2 हजार 560 उमेदवार उतरले आहेत. यापैकी 391 उमेदवारांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच, कर्नाटकमधील निवडणुकीत नशीब आजमावू पाहणाऱ्या उमेदवारांपैकी 15 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी एडीआरची आकडेवारी सांगते.
गुन्हेगारी उमेदवारांसंबंधी काही ठळक आकडेवारी :
- गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले उमेदावर - 254
- हत्येसंबंधी गुन्हे दाखल असलेले उमेदावर – 4
- हत्या करण्याचे प्रयत्न करण्यासंबंधी गुन्हे दाखल असलेले उमेदावर – 25
- महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल असलेले उमेदावर - 23
गुन्हे दाखल असलेले उमेदवार (पक्षनिहाय उमेदवार संख्या) :
- भाजप (224) – 83 (37 टक्के)
- काँग्रेस (220) – 59 (27 टक्के)
- जेडीएस (199) – 49 (21 टक्के)
- जेडीयू (25) – 5 (20 टक्के)
- आप (27) – 5 (19 टक्के)
- अपक्ष (1090) – 108 (10 टक्के)
गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार (पक्षनिहाय उमेदवार संख्या) :
- भाजप (224) – 58 (26 टक्के)
- काँग्रेस (220) – 32 (15 टक्के)
- जेडीएस (199) – 29 (15 टक्के)
- जेडीयू (25) – 3 (12 टक्के)
- आप (27) – 1 (4 टक्के)
- अपक्ष (1090) – 70 (6 टक्के)
श्रीमंत उमेदवारांचीही कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदावारांमध्ये कमी नाही. 2 हजार 560 उमेदवारांपैकी 883 (36 टक्के) उमेदवार हे कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही टॉप श्रीमंत हे काँग्रेसचे आहेत, तर याच निवडणुकीतील 17 उमेदवार असे आहेत, ज्यांची संपत्ती शून्य आहे. तसेच, 340 उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली नाही.
कुठल्या पक्षाचे किती कोट्यधीश उमेदवार :
- काँग्रेस (220) – 207 (94 टक्के)
- भाजप (224) – 224 (93 टक्के)
- जेडीएस (199) – 154 (77 टक्के)
- जेडीयू (25) – 13 (54 टक्के)
- आप (27) – 9 (9 टक्के)
टॉप-3 श्रीमंत उमेदवार :
प्रिया कृष्णा (काँग्रेस)
मतदारसंघ – गोविंदराजानगर
संपत्ती – 1020 कोटी
कर्ज – 802 कोटी
एन नागाराजा (काँग्रेस)
मतदारसंघ – हसाकोटे
संपत्ती – 1015
डी के शिवकुमार (काँग्रेस)
मतदारसंघ – कनकपुरा
संपत्ती – 840 कोटी
कर्ज – 228 कोटी
शैक्षणिक पार्श्वभूमी
- 1351 (53 टक्के) उमेदवार 5 ते 12 पर्यंत शिकलेले आहेत.
- 981 (38 टक्के) उमेदवार पदवी आणि पदव्युत्तर आहेत.
- 50 (2 टक्के) उमेदवार अशिक्षित आहेत.