Victory Day of Kargil : कारगिल युद्धाला (Kargil War) 23 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये युद्ध झालेल्या ठिकाणी पुन्हा एकदा देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळत आहे. कारगिल विजय दिनानिमित्त देशात 24 ते 26 जुलै दरम्यान 'कारगिल विजय दिवस उत्सव' (Victory Day Celebration) उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशभरातून लोकांचा ओढा कारगिलकडे वळत आहे. या विजय दिनानिमित्त ज्या जवानांनी प्राणाची बाजी लावली अशा जवाना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये पोहोचत आहेत. श्रीनगरमधील 126 किमी दूर बर्फाळ वाळवंटात लडाख येथे द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्ध स्मारक आहे. तेथे देशभक्तीपर वातावरण आहे.


कारगिल युद्धात 700 हून अधिक भारतीय सैनिकांचं बलिदान


भारताला कारगिल युद्धात विजय मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेला 26 जुलै रोजी 23 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल युद्धात 700 हून अधिक भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजी लावत पाकिस्तानी सैन्याला नमवत भारताला विजय मिळवून दिला. कारगिल विजय दिनानिमित्त पुन्हा एकदा आपण युद्धात सहभागी सैनिक आणि अधिकारी यांच्या बलिदानाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.


उत्सव सुरु होण्याआधीच पर्यदकांची गर्दी
कारगिल विजय दिनाला 26 जुलै 23 वर्षे पूर्ण होणार असून सैन्याकडून यानिमित्त जोरदार उत्सवाची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीनगरमध्ये पोहोचू लागले आहेत. कारगिल स्मारकाला भेट देत पर्यटक शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. नागरिक आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये आजही शत्रूला थोपवण्यासाठी तोच जोश आणि उत्साह कायम आहे.


लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित
कारगिल आणि द्रास येथे लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असून यावेळी कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यालाही सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्याने मोठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कारगिल युद्धाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला असेल, पण आजही देश ते युद्ध विसरू शकलेला नाही. कारगिल विजय दिवस साजरा करण्यामागे विश्वास आहे की, देश शहीदांचे बलिदान आणि शत्रूला अद्याप विसरलेला नाही.