नवी दिल्ली : भारत दरवर्षी 26 जुलै  रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. भारताच्या बहादूर सैनिकांचं स्मरण या दिवशी केलं जातं.  भारताच्या सैनिकांनी पाकिस्तान विरुद्ध 1999 ला लढताना आपल्या प्राणाची बाजी लावत विजय मिळवून दिला. ते एक युद्ध नव्हतं तर भारताची हिम्मत, एकता आणि बलिदानाचं प्रतीक होतं. 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी मिळून कारगिलमधील उंच टेकड्यांवर ताबा मिळवला होता. भारतानं त्यांना पराभूत करण्यासाठी ऑपरेशन विजय सुरु केलं होतं.  

कारगिल युद्ध जवळपास 60 दिवस सुरु होतं, ज्यामध्ये अखेर भारताला 26 जुलै 1999 ला विजय मिळाला होता. कारगिलच्या प्रत्येक टेकडीवर भारताचा तिरंगा फडकवला गेला होता. त्या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते. या दिवशी भारतीयाच्या मनात सैन्याच्या देशभक्ती प्रती समर्पण आणि शहिदांप्रती आदर दिसून येतो.  

कारगिल युद्धात कोणत्या राज्यातील सर्वाधिक जवान शहीद झाले?

कारगिल युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते. यामध्ये उत्तराखंडमधील 75 सैनिकांचा समावेश होता. उत्तराखंडमधील सर्वाधिक जवान कारगिल युद्धात शहीद झाले. या छोट्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सैनिक त्या युद्धात शहीद झाले. त्यांचं स्मरण करण प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. उत्तराखंडच्या लोकसंख्येपैकी 15 टक्के लोकसंख्या माजी सैनिकांची आहे. उत्तराखंडच्या गढवाल रायफल्स आणि कुमाऊं रेजिमेंटच्या जवानांनी या युद्धात शौर्य गाजवलं.  एकट्या गढवाल रायफल्सचे 47 जवान शहीद झाले. त्यापैकी 41 उत्तराखंडचे होते. कुमाऊं रेजिमेंटचे 16 जवान देखील शहीद झाले.

उत्तराखंडनंतर हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक जवान शहीद झाले होते. हिमाचल प्रदेशमधील 52 जवान कारगिल युद्धात शहीद झाले  होते. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा देखील हिमाचल प्रदेशचे होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र जाहीर करण्यात आलं. रायफलमॅन संजय कुमार यांना परमीवर चक्र देण्यात आलं ते देखील हिमाचल प्रदेशचे होते.  

भारताचा मोठा विजय,  युद्धावर किती खर्च झालेला

भारतानं कारगिल युद्धावेळी 5000 ते 10000 कोटी रुपये खर्च केले. हवाई दलाला ऑपरेशन राबवण्यासाठी 2 हजार कोटी लागले होते.  या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले. पाकिस्तानचं देखील मोठं नुकसान झालं. पाकिस्तानचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले. मात्र, पाकिस्तानकडून 357 जवानांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.