नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु यूनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्या कुमारला बिहारमधील बेगूसराय या मतदारसंघात मदत करणार आहेत.
कन्हैय्या कुमारने 2019 ची लोकसभा निवडणूक बेगूसराय मतदारसंघातून लढावी, अशी डाव्या पक्षांची इच्छा असल्याचं सीपीआयचे राज्य सचिव सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस आणि आरजेडीसह इतर पक्षांचाही कन्हैय्या कुमारला पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.
सीपीआयने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये सहा जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय इतर मित्र पक्षांशी चर्चा करुन घेतला जाईल. ज्या सहा जागांवर उमेदवार देण्याची इच्छा आहे, त्यामध्ये बेगूसराय, मधुबनी, मोतीहारी, खगरिया, गया आणि बांका यांचा समावेश आहे, अशी माहिती सत्यनारायण सिंह यांनी दिली.
दरम्यान, कन्हैय्या कुमारही लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं. महाआघाडीतील घटक पक्ष आरजेडी, काँग्रेस, डावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कन्हैय्या कुमारला समर्थन असेल, असंही त्यांनी सांगितलं.
कन्हैय्या बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील बरौनी प्रखंड अंतर्गत बिहट पंचायत क्षेत्रातील रहिवासी आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका, तर वडील शेतकरी आहेत. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेगूसरायमध्ये सध्या भाजपचे वरिष्ठ नेते भोला सिंह खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीचे उमेदवार तनवीर हसन दुसऱ्या आणि सीपीआयचे राजेंद्र प्रसाद सिंह जेडीयूच्या समर्थनाने तिसऱ्या क्रमांकावर होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2018 10:13 AM (IST)
महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्या कुमारला बिहारमधील बेगूसराय या मतदारसंघात मदत करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -