नवी दिल्ली : काल मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा (modi government expansion) विस्तार झाला. यात काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. नागरी हवाई वाहतूक मंत्रीपदाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदेंकडे आली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच शिंदे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक (Jyotiraditya Scindia Facebook hack) झाल्याची माहिती समोर आली. रात्री 12.23 च्या सुमारास कुणीतरी ज्योतिरादित्य शिंदे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करुन पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेलं भाषण अपलोड केलं. 


पदभार स्वीकारताच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले..


हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर काही मिनिटात अकाऊंट रिकव्हर करण्यात आलं.  ग्वालियरमध्ये यासंदर्भात FIR दाखल करण्यात आली आहे. ग्वालियर क्राईम ब्रांचमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरु केला आहे.  


शिंदे यांचं अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच सायबर टीम अॅक्टिव्ह झाली. काही मिनिटातच हॅकिंग रोखली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोबतच अपलोड केलेला व्हिडीओ देखील तात्काळ डिलिट केला गेला. शिंदे यांचे समर्थक कृष्णा घाटगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुवारी दुपारी माजी आमदार  रमेश अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन ग्वालियरच्या क्राईम ब्रांच ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात FIR दाखल केली आहे.


आठ आडवड्यांच्या आत तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणार; Twitter ची दिल्ली उच्च न्यायालयाला ग्वाही


ज्योतिरादित्य शिंदे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली.  ग्वालियरमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल होताच चौकशी सुरु करण्यात आली आहे.  क्राइम ब्रांचनं या प्रकरणी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  



मार्च 2020 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्यसभेचे सदस्य आहेत.