जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
जे. पी. नड्डा मोदी सरकारच्या काळात आरोग्य खात्याची धुरा सांभाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्मान भारत यशस्वी होण्यामध्ये नड्डा यांचे मोठे योगदान आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नड्डा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. आता नड्डा यांच्यावर जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाची जबाबदारी आहे.
BJP President | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवडणूक, जे.पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार | ABP Majha
जे. पी. नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 मध्ये पटनातील बिहार येथे झाला. नड्डा यांचे वडील नारायण लाल नड्डा पटना विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि रांची विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. नड्डा यांनी सुरुवातीचे शिक्षण बिहार येथील स्नातक विश्वविद्यालयात पूर्ण केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले. 1975 सालच्या प्रकाश नारायण यांच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.