या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्या यशवंत विद्यालयाची ऐश्वर्या मुंडकर, रायगडचा गोविंदराजू, हिंगण्याचा यश कुमार, उस्मानाबाद येथील पूनम चव्हाण, मिश्रीलाल पहाडे स्कूलचा जय जगदीश पारीख , सेंट लॉरेन्स स्कूलचा श्रेयस मयूर पांडव, पोदार स्कूल नचिकेत पाटील, बजाजनगर येथील ऑर्चिड स्कूलचा जयेश राजेंद्र खोमणे, नवोदय विद्यालयाचा अर्जुन थोरात तर मिश्रीलाल पहाडे स्कूलचे शिक्षक अनंत बनगर यामध्ये सहभागी झाले आहेत.
Pariksha Pe Charcha 2020 | देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार | ABP Majha
वर्धा येथील चक्रधर काळे देखील या चर्चेमध्ये सहभागी झाला आहे. चक्रधर अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. चक्रधरला वाचन, वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. त्याला भजन, किर्तनासोबत अध्यात्माची देखील आवड आहे. संधी मिळाल्यास पंतप्रधान मोदी यांना शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधित प्रश्न विचारणार असल्याचं चक्रधर काळे सांगितले आहे. परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन परिक्षेत चक्रधर सहभाग नोंदवला होता. चक्रधर या परीक्षेत उत्तीर्ण झाला.
देशातील दोन हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत ते परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर येणार ताण या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.