नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मध्य दिल्लीमध्ये उमरवर गोळीबाराचा प्रयत्न झाला असून यात तो थोडक्यात बचावला.

संसदेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबबाहेर उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न झाला. 'निर्भय स्वातंत्र्य दिशेने' या विषयावरील एका चर्चासत्राला उमर उपस्थित होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

उमर खालिदवर हल्ला करणारा हल्ल्यानंतर पसार झाला. अद्याप हल्लेखोराची ओळख पटलेली नाही, मात्र त्याच्या हातून पडलेली पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या जीवघेण्या हल्ल्यामागील कारणही अस्पष्ट आहे.


कोण आहे उमर खालिद?

उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता आहे. डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत आहे. युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम आहे.

संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफझल गुरुला फाशी ठोठावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी उमर खालिदसह काही विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, असा जबाब कन्हैया कुमारने दिला होता. याप्रकरणी उमरला निलंबित करण्यात आलं होतं.

जेव्हा देशविरोधी घोषणाबाजी सुरु होती, त्यावेळी खालिदची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. या उमर खलिदचं महाराष्ट्र कनेक्शन आहे. अमरावतीच्या तळेगावातील उमरचं घर 'एबीपी माझा'ने शोधून काढलं. तळेगावात उमरच्या पालकांचं वडिलोपार्जित घर आहे. पण 35 वर्षापूर्वी उमरचं कुटुंबं अमरावती सोडून दिल्लीला स्थायिक झालं.

संबंधित बातम्या


जेएनयू वाद: उमर खालिद पोलिसांच्या ताब्यात


उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?


शाळेत असताना उमर खालिद माझा ज्युनियर होता: हुमा कुरेशी


उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही