Jharkhand News : झारखंडच्या देवघरमध्ये (Deoghar) रोपवेच्या (Ropeway)  दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. काल दुपारची ही घटना असून अजूनही 48 जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सध्या एनडीआरएफ (NDRF) आणि आयटीबीपीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.  


झारखंड (Jharkhand) च्या देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेचा भीषण अपघात झाला. अजूनही अनेक पर्यटक रोपवेमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप परत आणलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


NDRF कडून बचाव कार्य सुरु 


भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर आज सकाळी साडेसहा वाजता त्रिकुटी पर्वतावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासह ITBP, भारतीय सेना आणि NDRF ची टीम त्रिकूट पर्वतावर पोहोचली आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून ट्रॉलीतून सुखरूप खाली आणलं जाणार आहे.  


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप 48 प्रवासी विविध ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून एकूण 8 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 


देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. त्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना संयम राखण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे.


झारखंडमधील देवघरमध्ये एक अपघात झाला आहे. येथील त्रिकूटी डोंगरावरील रोपवेमध्ये बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली. एकूण 48 लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सुमारे 20 तास पर्यटक रोपवेमध्ये अडकून पडले आहेत. अडकलेले पर्यटक हे बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी अपघात, मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. रविवारी संध्याकाळपासून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफ आणि लष्कराचं पथकाकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.