विमान तिकिटांवर 25 टक्के सूट, जेट एअरवेजची ऑफर
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 09:00 PM (IST)
नवी दिल्लीः जेट एअरवेजने प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. आज मध्यरात्रीपासून म्हणजे रात्री 12 पासून तिकिटांवर 25 टक्के सूट मिळणार आहे. 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या ऑफरअंतर्गत परदेशात सवलतीत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत आंतरदेशीय प्रवास 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ही ऑफर एकेरी किंवा परतीच्या प्रवासासह उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही ऑफर प्रिमियर क्लास आणि इकोनॉमिक क्लास या दोन्ही प्रकारच्या श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. तर आंदरदेशीय विमानांसाठी केवळ इकोनॉमिक क्लासच्या तिकिटांवरच सवलत मिळणार आहे. फ्रिचार्जवर तिकिट बुक केल्यास 10 टक्के अतिरिक्त सवलत किंवा 250 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. जेट एअरवेजची वेबसाईट किंवा अपवर तिकिट बुकिंग सुविधा आहे.