JEE Advanced 2023: आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी घेण्यास येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा 2023 च्या (JEE Advanced) अभ्यासक्रमात बदल करण्यात आलाय. या नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 2023 चा सुधारित अभ्यासक्रम ऑनलाइन असणार आहे. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांमध्ये बदल करण्यात आलाय. आयआयटीच्या अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीय. 


आयआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, भौतिकशास्त्रात जनरल फिजिक्स, मेकॅनिक्स, थर्मल फिजिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इत्यादी विषयांमध्ये बदल करण्यात आलाय. रसायनशास्त्रामध्ये स्टेस्ट ऑफ मॅटर- गॅसेस अण्ड लिक्विड, केमिकल बॉन्डिंग आणि मॉलेक्यूलर स्ट्रक्चर इत्यादी. तर, गणितातील इतर विषयांसह रिलेशन अॅण्ड फंक्शन, अॅलजेब्रा, मॅथेमॅटिक्स विषयांत बदल करण्यात आलाय. 


जेईई एडवांन्स 2021 निकाल- 
या वर्षी, अभियांत्रिकीच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2 लाखांहून अधिक विद्यार्थी होते, जे संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यासाठी 3 ऑक्टोबरला परीक्षा झाली होती आणि 15 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. 


या परिक्षेत एकूण  एक लाख 41 हजार  699 विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी 41 हजार 862 विद्यार्थी पास झाले होते. आयआयटी दिल्ली झोनमधील मृदुल अग्रवाल या परीक्षेत अव्वल आला होता. त्यानं या परीक्षात 360 पैकी 349 गुण मिळवले होते. या झोनमधील काव्या चोपडाला 286 गुण प्राप्त करीत महिला उमेदवारांमध्ये अव्वल आली होती. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-