JEE Advanced 2023 Schedule Released: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटीने JEE Advanced 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. JEE Advanced ची तारीख जेईई अॅडव्हान्सच्या jeeadv.ac.in या अधिकृत साईटवर प्रसिद्ध झाली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी स्टेप बाय स्टेप शेड्यूल पाहू शकतील.  


अधिसूचनेनुसार, JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 30 तारखेपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 5 मे 2023 असेल.


परीक्षा दोन टप्प्यात 
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 4 जून 2023 रोजी घेण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. उमेदवारांना दोन टप्प्यामध्ये पेपर द्यावे लागणार आहेत. एकूण दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा दोन भागात घेतली जाईल, पहिली शिफ्ट 4 जून रोजी सकाळी 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5.30 अशी असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 3 तासांचा वेळ मिळेल. जेईई (Advanced) परीक्षेद्वारे, अभियांत्रिकी, विज्ञान, आर्किटेक्चरमधील बॅचलर, इंटिग्रेटेड मास्टर्स, बॅचलर-मास्टर ड्युअल डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश उपलब्ध आहे.


असं पाहा वेळापत्रक  


स्टेप 1: JEE Advanced 2023 परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी jeeadv.ac.in अधिकृत साइटला भेट द्या
स्टेप 2: त्यानंतर होमपेजवर दिलेल्या नवीनतम अनाऊंस विभागात जा
स्टेप 3: नंतर जेईई अॅडव्हान्स्ड 2023 इनफॉरमेशन शेड्यूल फॉर फॉरेन नेशनल कॅंडिडेट अँड रजिस्ट्रेशन फीस अवेलेबल ऑन  वेबसाइटवर क्लिक करा.
स्टेप 4: त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक तुमच्या स्क्रीनवर दिसेल
स्टेप 5: आपल्या माहितीसाठी वेळापत्रक डाउनलोड करा
स्टेप 6: डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट काढायलाही विसरु नका


जेईई मेन 2023 परीक्षेची अधिसूचना देखील अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध


शैक्षणिक सत्र 2023-24 साठी जेईई मेन 2023 परीक्षेची अधिसूचना देखील याआधीच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. यातले पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये तर दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेत (जेईई मेन) दोन पेपर असतात. पेपर 1 हा  (BE/B.Tech) साठी आहे. NITs, IIITs आणि इतर केंद्रीय अनुदानित संस्था (CFTIs) अनुदानित, मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठात अंडर ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग प्रोग्राम्स (BE/B.Tech.) मध्ये प्रवेश घेण्यासाठी हा पेपर असतो तर तर, बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर 2 घेतला जातो. याशिवाय, जेईई मेन ही जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षा आहे, जी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.


ही बातमी देखील वाचा


JEE Main Exam 2023: जेईई मेन परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; परीक्षा जानेवारीत, असा करा अर्ज, महत्वाच्या तारखाही जाणून घ्या... 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI