मुंबई : “नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे आहेत, आनंदीबेन पटेलांनी चुकीचं वक्तव्य करून मोदींची प्रतिमा खराब केली आहे ,” अशा शब्दांत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्न केलंच नाही,’ असं म्हणत गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलांनी काही दिवसांपूर्वी वाद निर्माण केला होता. आनंदीबेन यांच्या या दाव्याबाबत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
व्हिडीओतून उत्तर
जशोदाबेन यांनी आपल्या भावाच्या मोबाईलद्वारे व्हिडीओ बनवून आनंदीबेन यांचा दावा खोडून काढला. “नरेंद्र मोदींनी स्वत:च 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी सादर केलेल्या शपथपत्रात विवाहित असल्याचं सांगितलं होतं, तसंच माझ्या नावाचा उल्लेखही केला होता. एका सुशिक्षित महिलेने दुसऱ्या महिलेला असं बोलणं शोभत नाही.” असं या व्हिडीओत जशोदाबेन म्हणाल्या.
न्यूज एजन्सी आयएएनएसच्या वृत्तानुसार जशोदाबेन यांच्या भावानेही हा व्हिडीओ जशोदाबेन यांचाच असल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाल्या होत्या आनंदीबेन पटेल ?
मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमात म्हटलं होतं, “तुम्हाला माहिती आहे ना मोदींनी लग्न केलं नाही. पण अविवाहित असतानाही ते महिलांच्या अडचणी समजून घेतात”.
आनंदीबेन पटेलांचं हे वक्तव्य आश्चर्यकारक होतं. कारण 2014 साली वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात जशोदाबेन या आपल्या पत्नी असल्याचं नरेंद्र मोदी यांनीच सांगितले होते.
नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे : जशोदाबेन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2018 03:55 PM (IST)
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्न केलंच नाही,’ असं म्हणत गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलांनी काही दिवसांपूर्वी वाद निर्माण केला होता. आनंदीबेन यांच्या या दाव्याबाबत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -