जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या टेकडीवर रविवारी सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमधील चकमकीत दोन दहशवादी ठार झाले, तर एकाला अटक करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुमारे तीन दिवसांपूर्वी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली होती. ते दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात जात असताना दुपारी मुघल रोडजवळ त्यांना पकडण्यात आल्याच अधिकाऱ्यांनी सांगितले.


लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांचा हा संयुक्त गट असून जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकींना प्रभावित करण्यासाठी त्यांना येथे पाठविण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की सैन्याच्या मदतीने पोलिसांनी तीन संशयित अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच दुर्गम छतापाणी-दुगरान गावात संयुक्त शोध मोहीम राबविली.


ते म्हणाले की दहशतवाही बर्फ असलेल्या भागात अडकले होते. त्यांना शरण येण्यास आवाहन करण्यात आले मात्र त्यांनी नकार देत सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले.


गोळीबारात एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे. ते म्हणाले की, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय असून त्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दहशतवाद्यांचा हा गट तीन दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) शोपियान जिल्ह्यात घुसला असल्याचे समजते.


माहिती मिळताच पोलिसांनी सैन्यासह कारवाई सुरू करत पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले. पण हिमवृष्टीमुळे ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. सकाळी हवामान सुधारल्यानंतर ऑपरेशन पुन्हा सुरू केले. दहशतवाद्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास आाहन केलं. मात्र, त्यांनी नकार देत गोळीबार केला.


संबंधित बातम्या : 


DRDO ची नवी सब-मशीनगन ट्रायलमध्ये पास, एका मिनिटात तब्बल 700 राऊंड फायर