Jammu Night Curfew: जम्मू-काश्मीरच्या जम्मू प्रांतामध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मू परिसरात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
दरम्यान रात्रीच्या कर्फ्यू संदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिकारी अंशुल गर्ग यांनी मंगळवारी सांगितले. गर्ग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जम्मूमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने, डीडीएमए (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) ने 17 नोव्हेंबर (बुधवार) पासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे."
जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा आकडा 3 लाखांवर
जम्मू-काश्मीरच्या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असता हा आकडा 3 लाख 34 हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 453 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबरपासून जम्मूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिडीओ पाहा :
कोविंडसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचे उपराज्यपालांचे आदेश
तर दुसरीकडे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कोविडच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता कोविंडसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, कोरोना बाधित भागात कर्फ्यू लागू करण्याची तरतूद असेल, तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी एक धोरण आखले जाईल.
कोरोनाची तिसरी लाट टळली? 287 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात देशात 287 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभराच 8,865 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 11,971 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 56 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 63 हजार 852 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 38 लाख 61 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.5 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 30 हजार 793 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :