Target Killing In Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 12 तासांत दहशतवाद्यांनी 2 गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या केली. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. आतापर्यंत एकूण 4 हत्या झाल्याचे समजते. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी पंडितांचे पुन्हा एकदा स्थलांतर पाहायला मिळत आहे. काश्मीर खोर्‍यातून रात्री उशिरा मोठ्या संख्येने कर्मचारी जम्मूला पोहोचले. काश्मिरी पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांनंतर काश्मिरी पंडितांची मागणी लक्षात घेऊन खीर भवानी यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण
जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत चालली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएम पॅकेज अंतर्गत कर्मचारी अमित कौल यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. पुन्हा 4 हत्या झाल्या आहेत. 30-40 कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांची (सरकारची) सुरक्षित ठिकाणे फक्त शहरात आहेत, श्रीनगरमध्ये सुरक्षित जागा उपलब्ध नाही.


 






 


टार्गेट किलिंगनंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर


8 जूनपासून खीर भवानी यात्रेची तयारी सुरू होणार होती. मंदिराची स्वच्छताही बरीच झाली, मात्र मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांच्या हत्येचा निषेध सातत्याने सुरूच होता. गेली दोन वर्षे सोडली तर 1994 पासून ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. मात्र आता परिस्थिती बिघडल्याचे काश्मिरी पंडितांचे मत आहे. सध्या खीर भवानी यात्रा पुढे ढकलण्यात आली असली तरी अमरनाथ यात्राही 30 जूनपासून होणार आहे. अशा स्थितीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


12 तासांत टार्गेट किलिंगच्या दोन मोठ्या घटना


गुरुवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी बडगाममध्ये दोन गैर-स्थानिक मजुरांना लक्ष्य केले. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला. ठार झालेला मजूर बिहारचा रहिवासी आहे तर हल्ल्यात जखमी झालेला दुसरा मजूर पंजाबमधील गुरुदासपूरचा रहिवासी आहे. दोन्ही स्थलांतरित मजूर बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावात वीटभट्टीवर काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काम करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.


निरपराधांच्या हत्येची दुसरी घटना 
घटनेनंतर लगेचच, दोन्ही मजुरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे बिहारच्या दिलखुश कुमारला मृत घोषित करण्यात आले, तर दुसऱ्या मजुरावर उपचार सुरू आहेत. काल सकाळी कुलगाममध्ये बँक मॅनेजर विजय कुमार यांची हत्या करण्यात आली होती. विजय कुमार हा राजस्थानचा रहिवासी होता, मात्र तो गेल्या 3 वर्षांपासून काश्मीरमध्ये काम करत होता. कुलगाममध्ये एका निरपराधांच्या हत्येची ही दुसरी घटना आहे.


संबंधित बातम्या


Target Killing: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचं कुकृत्य; कुलगाममधील बँक मॅनेजरची हत्या, गृहमंत्रालय अलर्ट मोडवर 


Jammu Kashmir : कुलगाममध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेमध्ये झाडल्या गोळ्या