नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात 12 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे तर हल्ला झालेले पर्यटक हे राजस्थानचे नागरिक असून यात काही स्थानिकही जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दहशतवादी हे पोलिस युनिफॉर्ममध्ये आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे.
ज्या पर्यटकांवर हल्ला झाला ते पर्यटक हे राजस्थानचे असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने हिंदूंच्या विरोधात भडकाऊ भाषण दिलं होतं. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. अमरनाथ यात्रा येत्या काहीच दिवसात सुरू होणार आहे. त्या आधी हा दहशतवादी हल्ला झाल्याने चिंता वाढली आहे.
पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हल्ला
जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच या पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांची संख्या कमी करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
हे दहशतवादी पोलिस गणवेशात आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोधमोहीम सुरू केली आहे.