चेन्नई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. चिदंबरम म्हणाले की, जम्मू काश्मीर हे हिंदूबहुल राज्य असतं तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तिथलं कलम 370 कधीही हटवलं नसतं.


चिदंबरम म्हणाले की, जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था अशांत काश्मीरची स्थिती कव्हर करत आहेत. मात्र भारतीय मीडिया मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांचा (भाजपचा) दावा आहे की, काश्मीरची परिस्थिती ठिक आहे. परंतु हे सत्य नाही. भारतीय मीडिया तिथली अशांती कव्हर करत नसेल, तर त्याचा अर्थ तिथे सर्व काही अलबेल आहे असा होत नाही.

चिदंबरम यांनी यावेळी सात राज्यांमधील सत्तारुढ असलेल्या स्थानिक पक्षांवरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे. चिदंबरम म्हणाले की, लोकसभेत जरी आपल्याकडे बहुमत नसले तरी राज्यसभेत आम्हाला आमची बाजू लावून धरता आली असती. विरोधी पक्षांमध्ये भाजपबाबत असलेल्या भीतीमुळे त्यांनी कलम 370 हटवण्याच्या विधेयकाला विरोध केला नाही. सातही पक्षांनी (अन्नाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, तृणमूल काँग्रेस, जद(यू) ) आम्हाला सहकार्य केले नाही. त्यामुळे राज्यसभेतही भाजपने सर्वांना मात दिली.

Article 370 | कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर राहुल गांधींनी मौन सोडलं