Encounter In Kulgam : जम्मू काश्मिरच्या (Jammu Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक जवान जखमी झाला आहे. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासंबंधित अधिक माहिती देत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सैन्य दल आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत किरण सिंह (Kiran Singh) हा जवान जखमी झाला आहे. श्रीनगरमध्ये (Srinagar) जखमी सैनिकावर उपचार सुरु आहेत. सैन्य दलाकडून आता परिसरातील शोधकार्य़ थांबवण्यात आलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सैन्य दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला आणि शोधकार्य सुरु केलं. यावेळी सैन्य दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून सैन्य दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, यामुळे शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झालं. यावर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक जवान जखमी झाला. या हल्ल्यात मंजूर लोन असं मृत्यू झालेल्या नागरिकाचं नाव आहे.
एका पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, 'दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. कुलगाम परिसरात सुरू असलेली शोध मोहीम आता संपली आहे. मात्र, नागरिक कसे जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Bhandara : मदतीच्या बहाण्यानं महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडिता गंभीर, नागपुरात उपचार, प्रत्येक श्वासासाठी झुंज
- Gadchiroli Naxal: नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, स्फोटकं जप्त
- Chenab Bridge : चिनाब रेल्वे ब्रिज पूर्णत्वाच्या दिशेने, ठरणार जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज