Lashkar-e-Taiba Terrorist Arrested : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन आणि 11 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी डांगीवाचा पोलिस स्टेशनच्या हडीपोरा-रफियााबादमध्ये नाकाबंदी केली होती. नाका पॉईंट येथे तपासणी सुरू असताना, सुरक्षा दलांना पाहताच लोरीहामा लिंक रोडवरून हडीपोराकडे येत असलेल्या दोन संशयित व्यक्तींनी रस्त्यावरून पळ काढल्याचे समजले.


दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त


या कारवाईत सोपोर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांनी दोन्ही संशयितांचा पाठलाग करून त्यांना जिवंत पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 पिस्तुल, 2 पिस्तुल मॅगझिनसह 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे तारिक अहमद वानी मुलगा दिवंगत बशीर अहमद वानी आणि इश्फाक अहमद वानी मुलगा अली मोहम्मद अशी आहेत. दोघेही रंगरेथ, ओल्ड एअरफील्ड, श्रीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.


लष्कर-ए-तैयबाचे हायब्रीड दहशतवादी


अटक करण्यात आलेले आरोपी लष्कर-ए-तैयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे  हायब्रीड दहशतवादी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आणि ते सतत सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले करण्याच्या संधीच्या शोधात होते. दोन्ही दहशतवाद्यांविरोधात रफियााबादच्या डांगीवाचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Mega Block Updates : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या


Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात' आज; नेमकी कोणती घोषणा करणार? देशवासियांचं लक्ष


Maharashtra Politics : घटनात्मक कोंडीच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देईल, नीलम गोऱ्हेंचा विश्वास


व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप