Farooq Abdullah : जम्मू-काश्मिरमधून (Jammu and Kashmir) कलम 370 रद्द केल्याच्या घटनेला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी आज काश्मीरमधील परिस्थितीवर मोठे विधान केले आहे. जोपर्यंत शेजाऱ्यांसोबतची परिस्थिती सुधारत नाही, तोपपर्यंत येथील दहशतवाद संपणार नाही असं वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांना काश्मीरमधील परिस्थितीशी जोडले आहे. यासोबतच त्यांनी चीन आणि पाकिस्तानला शक्तिशाली शेजारी म्हणून वर्णन केले आहे. आपण अचानक शांतता येईल या भ्रमात जगत आहोत. चीन असो वा पाकिस्तान, आपले शेजारी शक्तिशाली आहेत असे ते म्हणाले.
अचानक ट्रम्प यांचे पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध वाढले
एएनआय या वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात फारुख अब्दुल्ला म्हणाले की काश्मीरवरील दोन्ही नेत्यांच्या विचारसरणीतील फरक सर्वांना प्रभावित करत आहे. आता अचानक ट्रम्प पाकिस्तानशी अधिक मैत्रीपूर्ण झाले आहेत. अमेरिका आपल्याला रशियन तेल घेऊ नका असे सांगते, परंतु पाकिस्तानला सांगते की ते त्यांना कच्चे तेल पाठवेल आणि तेथे शुद्धीकरण होईल, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. अशा प्रकारे, ते त्या देशाला बळकटी देत आहेत. चीन आधीच त्यांच्या मागे आहे असे अब्दुल्ला म्हणाले.
आपले शेजारी आपले मित्र नाहीत
आपल्या शेजारचे देश आपले मित्र नाहीत. कोणता शेजारचा देश आपला मित्र आहे? असा सवाल अब्दुल्ला यांनी केला. आपण त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करावी असा विचार केला पाहिजे. इंदिरा गांधींनी सार्कची स्थापना केली होती, जेणेकरुन शेजारी देश प्रादेशिक समस्या एकत्र सोडवू शकतील, आर्थिक विकास करु शकतील आणि शांतता राखू शकतील असे अब्दुल्ला म्हणाले.
आपले शेजारी शक्तिशाली आहेत, मग ते चीन असो वा पाकिस्तान
मला आज शांतता दिसत नाही. मला वाटते की आपण अचानक शांतता येईल या भ्रमात जगत आहोत. आपले शेजारी शक्तिशाली आहेत, मग ते चीन असो वा पाकिस्तान असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. आपल्याला तोडगा शोधावा लागेल. युद्ध हा उपाय नाही. शेवटी संवादातूनच तोडगा निघतो असे अब्दुल्ला म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: