मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जलीकट्टूच्या आयोजनासाठी राज्य सरकारने विधानसभेत विधेयक मांडले होतं. हे विधेयक विधानसभा सदस्यांच्या मंजुरीनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं होतं. याला राष्ट्रपतींनी 31 जानेवारी 2017 रोजी मंजुरी दिली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आभार मानले असून, या पत्रात, जलीकट्टूच्या आयोजनासाठी समर्थन दिल्याबद्दल तामिळनाडू सरकार आणि जनतेच्यावतीने आभार मानले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातही जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी ही मागणी जोर धरत आहे. यासाठी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेऊन अध्यादेशाची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली असून, राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आध्यादेश काढू, असे आश्वासन त्यांनी बैलगाडी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे.
संबंधित बातम्या
VIDEO स्पेशल रिपोर्ट : जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला सूट का नाही?
बैलगाडी शर्यतीसाठी अध्यादेश काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज
बैलगाडी शर्यतीसाठी टॉवरवर चढून आंदोलन
... तर उद्या वाहनांवरही बंदी आणणार का, कमल हसनचा सवाल
जलीकट्टूला हिंसक वळण, पोलीस ठाणे पेटवले, 150 आंदोलक ताब्यात
जलिकट्टूसाठीचे आंदोलन तीव्र, तीन आंदोलकांचा मृत्यू तर 28 जण जखमी
‘जलिकट्टू’च्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी
जलीकट्टूसाठी रहमान, अश्विन, विश्वनाथन मैदानात