नवी दिल्ली : पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.  मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.


भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.


या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहर, भाऊ इब्राहिम अहमदसह हिटलिस्टवर असलेले महत्वाचे दहशतवादी ठार झाले आहेत. यात प्रामुख्याने मौलाना उमर, मुफ्ती अजहर  खान या अतिरेक्यांचा समावेश आहे.


पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला.पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते,  अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

असा ठरला अॅक्शन प्लॅन
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते.
सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना काही विकल्प दिले होते.
यानंतर लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनविण्यात आले. या अड्ड्यांची माहिती २०-१२ फेब्रुवारीलाच घेतली होती.
मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले.
मुख्य हल्ला केला त्यावेळी  वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला.

पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा  
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या कारवाईत अनेक अतिरेकी आणि जैशचे कमांडर ठार झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला हल्ला केला होता. पाकिस्तानला अतिरेक्याविरोधात पुरावे देऊन आणि वारंवार सांगूनही हात वर केले, असेही ते म्हणाले.

जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक होता, असे गोखले म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असे गोखलेंनी सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला जोरदार तडाखा
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.  या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला आहे. मिराज-2000 विमान शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानांद्वारे एका तडाख्यात शत्रूंच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करून टाकण्याची शक्ती असते.