Jagannath Puri Temple : देशातील अनेक ठिकाणच्या मंदिरांना भाविक मोठ्या प्रमाणात दान देत आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं दान मंदिरांच्या दानपेटीत जमा झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, ओडिसातील पुरीचं जगन्नाथ मंदिर (Jagannath Puri Temple) हे देशासह जगभरात लाखो भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. या मंदिराला दरवर्षी भाविका मोठ्या प्रमाणात दान देतात. ओडिसा सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 वर्षात मदिराला 113.02 कोटी रुपयांचं दान भाविकांनी दिलं आहे.
पुरीचं जगन्नाथ मंदिर हे देशातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात भाविकांनी या मंदिराला भेटी दिल्या आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिराला गेल्या तीन आर्थिक वर्षांत 113.02 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ओडिशा सरकारचे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी विधानसभेत देणगीच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये मंदिरातील दानपेटी, बँक खाती आणि इतर स्त्रोतांकडून धार्मिक देणग्या मिळाल्या आहेत.
जगन्नाथ मंदिराला 2022-23 या वर्षात मिळाली होती सर्वाधिक देणगी
जगन्नाथ मंदिराला देण्यात येणाऱ्या देणगीबाबत नुकतेच ओडिशा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर राज्य सरकारच्या वतीने उत्तरे देण्यात आले आहे. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे. येथे भगवान श्रीकृष्ण तसेच त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे मंदिर आहे. मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 22 ते 2023 ते 24 या काळात मंदिराला दानपेटीत 40.61 कोटी रुपये, बँक खात्यात 59.79 कोटी रुपये तर इतरमध्ये 12.60 कोटी रुपये देण्यात आले आहेत. जगन्नाथ मंदिराला 2022-23 मध्ये सर्वाधिक 50.80 कोटी रुपये, तर 2023-24 मध्ये 44.90 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 17.31 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. या वर्षी पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा रत्न भंडार चर्चेत होते. कारण तब्बल 46 वर्षांनंतर ते उघडण्यात आले होते. याआधी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले आणि धार्मिक विधीनंतर एका शुभ मुहूर्तावर मंदिरातील रत्न भांडार तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आले.
दरवर्षी लाखो भाविक भक्त अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. यावेळी भाविक दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान देखील देत असतान. कोण पैशांच्या स्वरुपात दान देते तर कोण सोनं चांदी तर कोणी वस्तुंच्या स्वरुपात दान देत असतात.
महत्वाच्या बातम्या: