कोलकाता : 'महिलांचं कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली' या आशयाची फेसबुक पोस्ट लिहून खळबळ उडवणाऱ्या जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. कोलकात्यातील प्राध्यापक कनक चंद्र सरकार यांनी रविवारी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे टीकेची झोड उठली होती. महिला आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकार यांना युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास करणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांच्या समितीने सरकार यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर विभागप्रमुख ओम प्रकाश मिश्रा यांनी तात्काळ कनक चंद्र सरकार यांना पुढील लेक्चर घेण्यापासून रोखलं.
'कनक चंद्र सरकार यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे' अशी प्रतिया कुलगुरु सुरंजन दास यांनी दिली. 'हे निंदास्पद आहे. अशा प्रकारचं वर्तन कदापि सहन केलं जाणार नाही. महिला आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकार यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश करु देणार नाही' असंही दास यांनी स्पष्ट केलं.
फेसबुक पोस्ट काय होती?
'बिस्किटचा पुडा किंवा कोल्डड्रिंकची बाटली घेताना तिचं सील तुटलं असल्यास तुम्ही विकत घ्याल का? एखादी मुलगी जन्मतः सीलबंद असते. मूल्य, संस्कृती आणि लैंगिक आरोग्य अशा अनेक गोष्टी कौमार्याशी निगडित असतात. तरुणांना कुमारिका पत्नी म्हणजे परी मिळण्यासारखं आहे'
सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर सरकार यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली होती.
कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली, प्राध्यापकाची फेसबुक पोस्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2019 07:17 AM (IST)
बिस्किटचा पुडा किंवा कोल्डड्रिंकची बाटली घेताना तिचं सील तुटलं असल्यास तुम्ही विकत घ्याल का? एखादी मुलगी जन्मतः सीलबंद असते, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिणारे कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक चंद्र सरकार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -