नवी दिल्ली : आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत 'नीट' परीक्षा एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. नड्डा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

 
केंद्र सरकार नीटच्या निर्णयाविरोधात कायदेतज्ञाचं मत जाणून घेणार आहे. मेडिकलच्या 'नीट' परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली होती.

 
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

 

राज्यातील विद्यार्थ्यांवर ‘नीट’परीक्षा लादण्यात आली असून त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षेची तयारी करावी. ‘नीट’प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.

 
राज ठाकरेंचा मोदींना कॉल

 

‘नीट’ परिक्षेच्या घोळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेण्यापूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली. राज ठाकरेंनी कालच मोदींना फोन करुन ‘नीट’वर तोडगा काढण्याची विनंती केली.

 
मुख्यमंत्र्यांची भेट

 

‘नीट’ परिक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.


संबंधित बातम्या :


'नीट' वादावर राज ठाकरेंचा थेट मोदींना कॉल


सरकारचे प्रयत्न सुरु, पण विद्यार्थ्यांनीही 'नीट'साठी तयार राहावं: मुख्यमंत्री



‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही


सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?


तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात


‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार


त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली


‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश