Mathura Train Accident: मथुरामध्ये (Mathura) भीषण रेल्वे अपघात (Railway Accident) झाला आहे. काल (मंगळवारी) रात्री उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा येथील रेल्वे स्टेशनवर ट्रेन रूळावरुन थेट प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना घडली त्यावेळी ट्रेनमध्ये कोणतेही प्रवासी उपस्थित नव्हते. अपघातापूर्वीच सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मथुरा हे शेवटचं स्थानक असल्यामुळे ट्रेन बंद करुन ठरलेल्या ठिकाणी उभी करायची होती. पण मोटरमनकडून एक चूक घडली आणि हा अपघात घडला. मोटरमननं ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबला त्यामुळेच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मोटरमननं एक्सीलेटर दिला आणि ट्रेन थेट रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढली.  


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या सुमारास शटल (लोकल) ट्रेन नवी दिल्लीहून मथुरा येथे पोहोचली. मथुरा शेवटचं स्थानक असल्यामुळे सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले. यानंतर ट्रेनचे शटर लावून ती ठरलेल्या ठिकाणी उभी करण्यात येणार होती. ट्रेन थांबवण्यासाठी मोटरमनला ब्रेक लावावा लागला, मात्र त्यानं चुकून एक्सलेटर दाबला आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली. परंतु, प्रवासी नसल्यानं कोणतीही जीवितनाही झालेली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 


दरम्यान, ही मोटरमनची चूक होती की, तांत्रिक हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाचा कोणताही अधिकारी कॅमेरासमोर काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र, इंजिन हटवल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. 






नेमकं घडलं काय? 


मिळालेल्या माहितीनुसार, ईएमयू ट्रेन शकूर बस्ती येथून येत होती. रात्री जवळपास 10.49 वाजता ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचली, ज्यानंतर ट्रेनमधील सर्वच्या सर्व प्रवासी उतरले. ट्रेन सुरू झाली आणि थेट ट्रॅकवरुन खाली उतरुन प्लॅटफॉर्मवर चढली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये पाहायला मिळतंय की, ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढलेलं आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्म तुटला असून ट्रेनचा पुढचा भागही काही प्रमाणात प्रभावित झाल्याचं दिसून आलं आहे. 


रेल्वे वाहतुकीवर परिणाम


मथुरा रेल्वे स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, "ट्रेन शकूर बस्ती येथून येत होती. सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. इंजिनखाली काही पिशव्या दिसत आहेत. स्टेशन डायरेक्टर सांगतात की, ट्रेन प्लॅटफॉर्मवर कशी पोहोचली याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे अप मार्गावरील काही गाड्यांवर परिणाम झाला आहे. प्लॅटफॉर्मवरून ट्रेन हटवण्याचं काम सुरू आहे. ट्रेन हटवल्यानंतर अप मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mathura Train Accident: ट्रेन आली, प्लॅटफॉर्मवर थांबली अन् निघताना रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली; मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात