ISRO Launched Two Singaporean Satellites: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या आणखी एका मोठ्या मोहिमेवर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (PSLV) रॉकेट लाँच केले आहे. या रॉकेटने सिंगापूरचे दोन मोठे सॅटेलाईट आणि एका इन-हाऊस प्लॅटफॉर्म यांच्यासह उड्डाण केले आहे.


इस्रोच्या मोहिमेअंतर्गत PSLV-C55 ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:19 वाजता उड्डाण केले. PSLV चे हे 57 वे उड्डाण आहे आणि PSLV कोर कॉन्फिगरेशनचा वापर करण्याचे हे 16 वे मिशन आहे. या मोहिमेला TLEOS-2 असे नाव देण्यात आले आहे.


इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, पीएसएलव्हीने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. “रॉकेटचा वरचा टप्पा उन्हाळी मोहीम पूर्ण करणार आहे. वरच्या टप्प्यावर सात पेलोड बसवले आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले तर पुढील एक महिना ते कार्य करेल. आम्ही पहिल्यांदाच PS4 मध्ये सौर पॅनेल तैनात करत आहोत. आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलद्वारे POEM च्या कामगिरीबद्दल अपडेट करू,” असेही ते म्हणाले.


कक्षेत पाठवले गेले उपग्रह


इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवर सिंगापूरच्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती. यात इस्रोने सांगितले होते की, शनिवारी श्रीहरिकोटा येथून PSLV रॉकेट PSLV-C55 सिंगापूरच्या 741 किलो वजनाचा उपग्रह TeLEOS-2 आणि 16 किलो वजनाचा उपग्रह Lumilite-4 यांच्यासह उड्डाण घेईल.


काय आहेत उपग्रहांची वैशिष्टये?


TeLEOS-2 हा एक रडार उपग्रह (Satellite) आहे. सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने तो तयार केला आहे. हा एक कृत्रिम छिद्र रडार उपग्रह आहे. हा उपग्रह आपल्यासोबत सिंथेटिक अपर्चर रडार घेऊन जाणार असून तो दिवसा आणि रात्रीच्या हवामानाची अचूक माहिती देणार आहे.


दुसरा उपग्रह LUMELITE-4 आहे, तो 16 किलो वजनाचा असून अत्यंत प्रगत उपग्रह आहे. या उपग्रहाला अतिशय उच्च वारंवारितेच्या डेटा एक्सचेंज सिस्टमच्या तांत्रिक प्रदर्शनासाठी विकसित केले गेले आहे. LUMELITE-4 हा एक प्रगत 12U उपग्रह आहे. सिंगापूरच्या ई-नेव्हिगेशन सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक शिपिंग समुदायाला त्याचा लाभ होण्यासाठी या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे. 


सिंगापूरसाठी हे दोन्ही उपग्रह महत्त्वाचे आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: