Akshay Kumar Selfiee OTT Release : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांचा 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 


'सेल्फी' 'या' ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज! (Selfiee OTT Release)


अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा 'सेल्फी' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सेल्फी'ला ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. 


'सेल्फी' या सिनेमाचं कथानक काय आहे?


'सेल्फी' या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 


इमरान हाशमी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण त्यानंतरही विजय चाहत्याला एक 'सेल्फी' देतो का हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमात अक्षय आणि इमरानसह नुसरत भरुचा आणि डायना पेंटीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज मेहताने या सिनेमात दिग्दर्शन केलं असून करण जौहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 






'सेल्फी' या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. राजने याआधी अक्षयसोबत 'गुड न्यूज' या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा 2019 साली सुपरहिट ठरला होता. त्यामुळे 'सेल्फी' प्रदर्शित होण्याआधी राज मेहता आणि खिलाडी कुमारची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असे म्हटले जात होते. पण तसे काहीही घडलेले नाही. या सिनेमाकडे सिनेरसिकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. 


संबंधित बातम्या


Selfiee Box Office Collection Day 2 : अक्षयच्या 'सेल्फी'ने केली निराशा; दोन दिवसात फक्त तीन कोटींची कमाई