तिहेरी तलाकविरोधात कायदेशीर लढा लढणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2018 08:12 AM (IST)
तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी (30 डिसेंबर रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
फोटो सौजन्य : जनसत्ता
NEXT
PREV
हावडा/ पश्चिम बंगाल : तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी (30 डिसेंबर रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गावती सिंह यांनी तिचं पक्षात स्वागत केलं.
यावेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तिहेरी तलाकसाठी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही तिने आभार मानले. पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
इशरत जहाँने यापूर्वीच भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतले होते. चॅटर्जी यांनी सांगितलं की, इशरत जहाँची सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नोकरीची व्यवस्था करावी असे तिने तिने केंद्र सरकारला आवाहन केलं आहे. तसेच राज्यातील ममता बॅनर्जी सरकार इशरत जहाँला कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोपही चॅटर्जी यांनी केला.
दरम्यान, तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीविरोधात कारवाईसाठी नुकताच लोकसभेत कायदा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. तसेच त्यावर मतदान घ्यावे अशीही मागणी ओवैसी यांनी केली होती. त्यानुसार, गुरुवारी (28 डिसेंबर 2017) या विधेयकावर मतदान घेण्यात आलं.
पण ओवैसींच्या बाजूने केवळ दोनच मतं पडली. तर त्यांच्याविरोधात 241 मतं मिळाली. दुसऱ्या प्रस्तावातही त्यांच्याविरोधात मतदान गेल्याने, हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -