Indian Railway Ticket Booking : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. या प्रवासासाठी प्रथम तिकीट बुकिंग करणे महत्वाचे असते. त्यातही तिकीट बुक केले आणि ते कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांसाठी ही त्रासदायक गोष्ट आहे. तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर तासंतास थांबावे लागते. त्यातही तिकीट कन्फर्म होण्यासाठी प्रवासाच्या जवळपास महिनाभर आधी तिकीट बुक करावे लागते. परंतु, एखाद्यावेळी अचानक रेल्वेने प्रवास करायायचा असेल तर कितीट मिळत नाही. मात्र, अलीकडेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तासंतास रेल्वे स्टेशनवर ताटकळत थांबण्याची आवश्यकता नाही. शिवाय यामध्ये तिकीट देखील कन्फर्म होण्याची खात्री असते.
अचानक रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली तर प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु, अनेक वेळा हे तत्काळ तिकीट बुक करत असताना उपलब्ध असलेली सर्व तिकीटे संपून जातात आणि मग तिकीट बुक होत नाही. मात्र, ही समस्या दूर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तत्काळ तिकीट बुक करू शकता.
प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही IRCTC मास्टर लिस्ट फीचर वापरू शकता. या फीचरद्वारे प्रवाशांनी आपली माहिती अगोदर भरावी. यानंतर, तुम्हाला तिकीट बुक करताना प्रवाशांचा तपशील भरावा लागणार नाही आणि तुमचे तत्काळ तिकीट काही मिनिटांत बुक होईल. या फीचरद्वारे, तुमची तत्काळ तिकिटे मिळण्याची शक्यता आणखी वाढेल.
असा करा मास्टर लिस्ट फीचरचा वापर
या फिचरचा वापर करण्यासाठी प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जावा.
त्यानंतर माय अकाऊंटवर क्लिक करून माय फ्रोफईलला भेट द्या
त्यानंतर Add / Modify Master List वर क्लिक करा.
येथे तुम्हाला प्रवाशाची सर्व माहिती म्हणजे नाव, लिंग, मोबाईल नंबर, वय आदी माहिती भरावी लागेल.
माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
आता प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार झाली.
आता बुकिंगच्या वेळी तुम्हाला My Saved Passenger लिस्टवर क्लिक करून प्रवाशांचे तपशील सहज भरता येतील.