नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी डिडीटल माध्यमातून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संदेश देणार आहे. तसेच योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ याला प्रोत्साहन दिले आहे.
डिजिटल माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे. तसेच सकाळी 7 वाजल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने डीडी नॅशनलवर योग प्रशिक्षकाद्वारे करण्यात येणारे योग सत्र प्रसारित करण्याची व्यवस्था केली आहे. अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, मिलिंद सोमण आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा हे कलाकार देखील सहभागी होणार आहेत.
योगा करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा यासाठी येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त "नमस्ते योगा"या मोहिमचे आयोजन केले आहे.
डिजीटल मंचावरुन आज साजरा होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’; पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2020 12:02 AM (IST)
सकाळी 7 वाजल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. डिजिटल माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -